राज्यात मनसेची सत्ता कधी येणार?; राज ठाकरे म्हणाले…

नागपूर : माजी पंतप्रधान अटलबिरी बाजपेयी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही भाषणाला प्रचंड गर्दी होत होती. त्यांना ऐकायला महाराष्ट्र लोटत होता. मात्र भाजप आणि शिवसेनेची सत्ता यायला सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे वाट बघावी लागली. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्याकरिता वेळही द्यावा लागतो. एक दिवस महाराष्ट्राची जनता आपल्याही हातात सत्ता देईन असा विश्वास मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडीसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही तयारीला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते बोलत होते.

Advertisement

राज ठाकरे म्हणाले, नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. लाखो स्वयंसेवक महाराष्ट्रासह देशभरात काम करत आहेत. तरीही देशात भाजपची सत्ता यायला पन्नास वर्षे वाट पाहावी लागली. आम्ही आमचे विचार आणि बाजू प्रामाणिकपणे मांडत आलो आहोत. ती लोकांनाही आवडते. आता ज्या मतदारांनी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांना सत्ता दिली, तीच जनता एक दिवस मनसेलाही सत्ता देईल. असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.

याचवेळी त्यांनी, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही 200-225 सीट्स नक्की लढवणार आहोत. माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page