मोठा अर्थिक व्यवहार झालाय, येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय अन् तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघाताला राजकीय वळण मिळालं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्यांच्या मुलावर कारवाई करताना पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.
त्यावरच आता पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ पैश्यावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकारी कायमस्वरूपी निलंबित केली पाहिजे, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.धंगेकरांनी ट्विट करत पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, कल्याणीनगर प्रकरणात आवाज उठवल्यानंतर पुणेकरांच्या दबावापुढे पोलीस प्रशासन नमले. आज तत्परता दाखवत आरोपी विशाल अग्रवाल याला अटक केली आहे.परंतु केवळ विशाल अग्रवाल याला अटक करून हे प्रकरण थांबणार नाही तर येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे.मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करत सर्व आरोपीस मदत होईल असाच तपास पोलिसांनी केला आहे.अपघाताच्या रात्री काय झाले याबाबत येरवडा पोलीस स्टेशन व ससून मधील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करण्यात यावे. केवळ पैश्यावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकारी कायमस्वरूपी निलंबित केली पाहिजे.




