संजय राऊतांना मोठा धक्का! न्यायालयानं ठोठावली तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण?

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना माझगाव कोर्टाने 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. राऊत यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याच प्रकरणामध्ये राऊत यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 15 दिवसाची कैद असल्याने संजय राऊत जामीनास पात्र आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. ते स्वत:ला सरेंडर करतील. त्यानंतर कोर्ट त्यांना जामीन मंजूर करण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते. परंतु कोर्टाने आपल्या नियोजीत वेळेत निकालाचे वाचन पूर्ण केले आहे.
काय आहे प्रकरण?
मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी, बदनामीची नोटीस दिली आहे, मुलुंड पोलिस स्टेशन येथे तक्रार ही दाखल केली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/ कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




