मराठा आरक्षणावरुन विखे पाटलांची शरद पवारांवर टीका, म्हणाले…

मुंबई : शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केली. अमित शाह यांच्या विधानाची जोरदार चर्चा झाली. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना शरद पवारांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं आहे. त्याच्या हातात देशाचं गृहमंत्रीपद आहे, असं शरद पवार म्हणाले. यावरून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
विखे पाटील नेमकं काय म्हणाले?
शरद पवार वैफायल्यातून टीका करत आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. तरी अशी टीका करतात. शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं. मग यावर आम्ही टीका करायची का? यापूर्वी कधी असं झालं नाही, असं विखे पाटील म्हणाले.
तसेच शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी त्या काळात एकही काम केलं नाही. मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांनी काय केलं? त्यांनी याबद्दल सांगावं. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची. त्यांचा हा धंदा लोकांनी पहिला आहे, अशी टीकाही विखे पाटलांनी शरद पवारांवर केली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




