मोठी बातमी ! पुण्यातील रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून

पुणे : पुण्यात कुख्यात गुंडाचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आलाय. या खुनाच्या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडालीय. रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री ही हत्या झाली. राजू शिवशरण असं गुंडाचं नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसात घटनेची नोंद झाली असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी (08 ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास रामटेकडी भागातील वंदे मातरम चौकात संशयित आरोपी महेश शिंदेने राजू शिवशरण याच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. पण राजू शिवशरण याने पैसे देण्यास नकार दिला. या रागातून महेश शिंदेने राजू शिवशरणच्या डोक्यात बॉटलने वार केला. या हल्ल्यामुळे शिवशरण जमिनीवर कोसळला. त्यानंतर महशे शिंदेने वीट, दगड आणि सिमेंटचे तुकड्यांनी त्यांच्या डोक्यावर वार केले. यावेळी त्याच्या वरील सहकाऱ्यांनीही त्याला मदत केली. पण या हल्ल्यावेळी निखिल चव्हाण यांनी मध्यस्थी केल्याने चव्हाण यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण हेदेखील गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात राजू शिवशरण यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी राजू शिवशरणचे नातेवाईक निखिल चव्हाण वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकऱणी वानवडी पोलिसांनी महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाडला ताब्यात घेतले आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




