महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका

सांगली – महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार आहे. जत विधानसभामधील विजय मोठा असणार आहे. गोपीचंद पडळकर यांना माणूस विधानसभामध्ये पाठवायचा आहे. विरोधक कुंभकर्णच्या अवस्थेत गेला पाहिजे, असा गोपीचंद पडळकर यांचा विजय करा, असं सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. जत विधानसभेतील भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ आज महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी सदाभाऊ खोत बोलत होते.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

Advertisement

शरद पवार असतील उद्धव ठाकरे असते, काँग्रेसवाले असतील यांनी देवेंद्र फडणवीसांना का घेरायला लागली आहेत माहीतय का?, कारण आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्या घरात गाय असते. राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे. गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं आहे, यामधील अर्धथानं वासऱ्याला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले ही चारही थानं मी वासरांनाच देणार…यानंतर शरद पवारांना नववा महिना लागला…पवारसाहेब म्हणाले, आता माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार?, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा…महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. तसेच गावातील नागिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे कोणी काम केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी. असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page