मोकामधील फरार घायवळ टोळीतील आरोपी सचिन गायवळ याच्या आवळया मुसक्या, राजस्थान मधुन केली अटक

कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५०/२०२५ भा.न्या.सं.क १०९, ३५१, ३५२, १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १११(१),१११(२), १११(३), १११ (६), १११(७), ६१(२), ४९, ३ (५) सह आर्म अॅक्ट कलम ३ (२५), सह मपोॲक्ट ३७ (१) (३) संह १३५,१४२ सह क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, ७ प्रमाणे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४), ३ (५),४ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास सहा पोलीस आयुक्त गुन्हे ०१ पुणे शहर श्री. शैलेश संखे हे करीत आहे.

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी नमुद गुन्हयातील पाहिजे फरारी आरोपी यांचा शोध घेवुन ते मिळुन आल्यास तपासी अधिकारी यांचे समक्ष हजर करणे बाबत आदेशीत केले होते. त्यानुसार गुन्हयातील पाहिजे फरार आरोपी नामे सचिन बन्सीलाल घायवळ वय ४८ वर्षे, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, अशिष गार्डनजवळ, शस्त्रीनगर, कोथरुड पुणे याचा युनिट ०३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार अतुल साठे, नितिन जगदाळे, मारुती पारधी, योगेश झेंडे व शुभम वागसकर असे शोध घेत असताना दि.०३/०६/२०२६ रोजी पोलीस हवालदार अतुल साठे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषनाव्दारे व गोपनीय माहितीव्दारे उपलब्ध झालेल्या माहितीवरुन सदर आरोपी हा धिंगपुर जिल्हा सिकर, राज्य राजस्थान येथे असल्या बाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. तात्काळ युनिट ०३ कडील पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व पोलीस अंमलदार हे सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन राजस्थान येथे जावुन तेथे स्थानिक पोलीसांच्या मदतीने नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे सचिन बन्सीलाल घायवळ याचा शोध घेतला असता तो धिंगपुर या गावामध्ये भाड्याने राहत असलेल्या एका घरामध्ये मिळुन आल्याने त्यास स्थानिक पोलीस स्टाफचे मदतीने काल दिनांक ०३/०६/२०२६ रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर सदर आरोपी यास आज रोजी मा. शिवाजीनगर न्यायालय पुणे येथे हजर करण्यात आले आहे. सदरचा आरोपी हा मागील ०९ महिन्यापासुन फरार होता. याला मा. न्यायालयाने फरार घोषित केले होते. सदर आरोपी हा ०५ मोक्या सारखे गंभीर गुन्हयामध्ये फरार होता.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त संजय दराडे, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १, श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शना खाली युनिट ०३ कडील पोलीस निरीक्षक

श्री. प्रशांत अन्नछत्रे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अर्चना वाघमारे, मारुती पारधी, अतुल साठे, नितिन जगदाळे, अमोल काटकर, संदिप शेळके, अनुष्का जगदाळे, योगेश झेंडे व शुभम वागसकर यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page