मेफेड्रोन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमास केले जेरबंद

मा. वरिष्ठांनी अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी यापुर्वीच आदेशीत केले आहे.
दि.०५/०६/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचेसह पोलीस अधिकारी व स्टाफ असे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलादर निशिकांत सावंत यांना एच.पी. पेट्रोलपंपापासुन थोड्या अंतरावर बसस्टॉप शेजारी, मुंढवा खराडी रोड, पुणे येथे एक इसम संशयितरित्या उभा असल्याचे दिसुन आले. त्यास ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने सदर इसमाची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपी नामे इमरान युसुफ शेख वय ३८ वर्षे रा. स.न.१४/७९ थिटेनगर दत्त मंदीरजवळ, विरभद्री बिल्डींग शेजारील इमारत, तिसरा मजला थिटेवस्ती खराडी पुणे मुळगाव गायरी मोहल्ला बसद, पुराना मश्जिद जवळ, प्रतापगढ राजस्थान याचे ताब्यात एकुण कि रु २०,९८,४००/- चा १०४ ग्रॅम ९२ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १९२/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा मेफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ कोठुन आणला व कोठे विक्री करणार होता याबाबत अधिक तपास करीत आहेत.
एकुण
हस्तगत
कि.रु. २१,०८,४००/- चे ऐवज कि रु २०,९८,४००/- चा १०४ ग्रॅम ९२ मिलीग्रॅम
मेफेड्रॉन (एम.डी.) व त्यामध्ये कि रु १०,०००/- ची एक मोबाईल फोन, असा
मुद्देमाल
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री गौहर हसन, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, यांचे सुचनांप्रमाणे सहा.पो.निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निशिकांत सावंत, अमोल सरडे, रिहान पठाण, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षिरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, राहुल शिंदे, आशा भिंगारे, जान्हवी सुर्यवंशी, मंगेश गुंड, अक्षय शिर्के यांनी केली आहे.




