बनावट सोन्याची बिस्कीटे खरे असल्याचे भासवुन फसवणुक करणारे अटटल आरोपीस केले जेरबंद..!

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेणेबाबत वरिष्ठांकडुन आदेशीत करण्यात आले होते. सदर आदेशान्वये पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले हे हडपसर पोलीस स्टेशन भाजी मंडई येथे पेट्रोलींग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉडवरील आरोपी नामे दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव वय ५२ वर्षे रा. जळकोट जि. लातुर हा त्याचे साथीदारासह साधना विदयालयाकडे जाणा-या कॅनल रोडवर चोरी करण्याच्या तयारीत आहे. सदरची बातमी पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक ०२ श्री. राम राजमाने यांना कळविली असता त्यांनी खात्री करुन योग्य ती कारवाई करणेबाबत व पोलीस उप निरीक्षक गौरव देव यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. सदर ठिकाणी गेले असता रेकॉडवरील आरोपी दिलीप स्वामी मिळून आला सदर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने दि. २४/०७/२०२५ रोजी सकाळी ११/१५ वा.चे सुमा प्रेमळ विठठल मंदीर फुटपाथजवळ पुणे येथे वयस्कर महीलेस जेवण वाटपाचे ठिकाणी गर्दी असल्याने तुमच्या गळयातील सोन्याची पोत पिशवीत ठेवा असे सांगुन सदर पिशवी फसवणुक करुन घेवुन गेल्याचे कबुल केले. सदर बाबत फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.१४८/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळाली आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे खिशात दोन हुबेहुब बनावट सोन्यासारखी दिसणारी पिवळया धातुची बिस्कीटे व एक बेनटेक्सची चेन मिळुन आली.
तसेच त्याने त्याचे साक्षीदारासह इरटीका या गाडीमधुन प्रवास करुन कराड जि. सातारा येथे वयोवृदध महीलेला बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवुन तिच्या गळयातील मणी मंगळसुत्र काढुन घेतले आहे. त्याबाबत कराड सिटी पोलीस स्टेशन येथे गु.रं.नं. २५८/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३१८ (४),३ (५) अन्वये गुन्हा दाखल आहे. नमुद आरोपीचा पोलीस अभिलेख तपासला असता तो रेकॉडवरील अट्टल गुन्हेगार असुन त्याचेवर अपहरण, अॅट्रॉसिटी, व फसवणुकी सारखे गंभीर गुन्हे महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असल्याची माहीती मिळाली. नमुद आरोपीतांकडुन एकुण १२,७५,०००/- रु.कि.चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात व आझाद पाटील यांनी केली आहे.




