मोठी बातमी ! जालन्यात काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू

जालना : जालना जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेत काळी पिवळी जीप थेट विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. राजूर येथील तुपेवाडी जवळ ही घटना घडली आहे. या घटनेने जालन्यात हळहळ व्यक्त होतं आहे

Advertisement

पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन 12 भाविकांनी भरलेली एक टॅक्सी जालन्याहून राजूर गावाकडे निघाली होती. या दरम्यान जालन्यातील राजूर येथील तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला. ज्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर दुचाकी चालकाला वाचवायला गेला आणि टॅक्सी घेऊन थेट विहिरीत कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने कुणालाच स्वत:ला वाचवता आले नाही. त्यामुळे या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात 3 जणांचा जीव वाचला आहे. त्या तीन जणांवर जालन्यात उपचार सुरू आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page