दिंडी सोहळयात मोबाईल चोरी करताना मिळुन आल्याने रेकॉर्डवरील आरोपीच्या आवळया मुसक्या..!

मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे प्रकाश देवराम परिहार, वय-२९ वर्षे, रा- लोहियानगर, पुणे याने व त्याचा साथीदार नामे मोहम्मद मनान जमाल शेख वय-२५ वर्षे रा. मार्केटयार्ड, गाळा नं.१८१, पुणे यांना मार्केटयार्ड परिसरातील शारदा गजानन मंदीराजवळ आलेल्या दिंडीतील फिर्यादी व इतर ०२ इसमांचे चोरीस गेलेले मोबाईल त्यांचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे अटक केली आहे.

दिनांक २०/०६/२०२५ रोजी मार्केटयार्ड परिसरात आलेल्या दिंडीतील इसम हे मोबाईल चोरीस गेले बाबत तक्रार देणेकामी पोलीस स्टेशन येथे आले असता श्रीमती मनिषा पाटील, वपोनि मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना पुढील कार्यवाहीकरीता आदेश दिले. दिले आदेशाप्रमाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जावध, राऊत व निगराणी पथकातील पोलीस अंमलदार लोणकर तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील बीट मार्शल वरील पोलीस अंमलदार यांनी मार्केटयार्ड परिसरात पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील आरोपी नामे प्रकाश देवराम परिहार यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांने व त्याचा साथीदार नामे मोहम्मद मनान जमाल शेख यांनी मोबाईल चोरी केले असल्याचे कबुल केले. त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी ०२ मोबाईल चोरी केले असचे कबुल केले असुन सदरचे मोबाईल ताब्यात घेवून त्यांचेवर गु.र.नं.१३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच गु.र.नं.१३७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपीतांस अटक करणेत आलेली आहे.

Advertisement

सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि- ०५ पुणे शहर, डॉ राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुनिता नवले यांचे आदेशाने तपास पथकातील अंमलदार पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जावध, राऊत व निगराणी पथकातील अंमलदार लोणकर तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील बीट मार्शल वरील अंमलदार यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page