फडणवीसांवर एवढं प्रेम असेल तर…; मनोज जरांगेंची प्रसाड लाड यांच्यावर टीका

जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. या वादात भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी उडी घेत देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. मनोज जरांगे यांना DD म्हणजे देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली होती. यावरुन आता जरांगे पाटील यांनी लाड यांच्यावर टीका केली.

जरांगे म्हणाले, माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायलं लाऊ नको, तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेत असं मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

Advertisement

मराठा आरक्षणावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे संतापले. ते म्हणाले की, हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काय म्हटलंय का? तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस. तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता, आता तुम्ही नीच निघाला.

देवेंद्र फडणवीसांना इशारा

मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे मंत्री मराठ्यांवर घालू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. ते म्हणाले की, तुम्हाला गोडीत सांगतोय, मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावू नका, आता मराठे तुमच्याकडे निघतील. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झाला, आता मारामाऱ्या लावून मजा बघू नका.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page