मोकोका गुन्ह्यातील फरार आरोपीतांच्या आवळल्या मुसक्या..!

दि.२३/१२/२०२४ रोजी कुख्यात गुंड सोन्या ऊर्फ निखील घायाळ रा. लोणी स्टेशन कदमवाकवस्ती याने पुर्वीचे घटनेचा राग मनात धरुन फिर्यादी व त्यांचा भाऊ यांना मोबाईलवर कॉल करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी व त्यांचा भाऊ हे लोणीकाळभोर येथील त्यांचे शेतात असताना दि.२३/१२/२०२४ रोजी कुख्यात रेकॉर्डवरील तडीपार गुंड सोन्या घायाळ त्याचे टोळीतील इतर ५ साथीदारांसह मोटार सायकल वरुन येवुन व त्याने श्री विजय श्रीरंग काळभोर यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले. तसेच त्याचे सोबतचे इतर सह आरोपीतांनी विजय काळभोर यास लोखंडी रॉड व लाथा बुक्यांनी व हाताने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ६०२/२०२४.भा.न्या.सं. कलम १०९,११८ (२),१८९ (२), १८९ (४), १९०, ३५२, ३५१ (३) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) (३) सह १३५. व क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंड अॅक्टकलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील एकुण ६ आरोपीतां पैकी सोन्या घायाळ सह ४ आरोपीतांना अटक करणेत आले होते. परंतु आरोपी नामे १) ओमकार धनंजय काळभोर वय २३ वर्षे रा. लोणी काळभोर २) रोहित अनिल चौधरी वय २६ रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे हे गुन्हा केल्यापासुन फरार झाले होते. ते दोन्ही फरार आरोपी स्वतः चे अस्तित्व लपवुन कोठेतरी लपुन बसले होते. त्यांनी त्यांचे मोबाईल व सर्व प्रकारचे संपर्काची साधने बंद केल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यानचे काळातच सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii) ३ (२), ३ (४) चा अंतर्भाव करणेत आल्यामुळे सदर फरार आरोपीतांना तात्काळ पकडणे अत्यावश्यक होते. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवुन लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी आरोपीतांचा शोध घेणेकरीता स्वतंत्र पथक तयार करुन अहोरात्र आरोपीतांचा मागोवा घेतला. अथक प्रयत्नानंतर लोणी काळभोर चे पथकास यश आले व दि. २१/०१/२०२५ रोजी या दोन्ही फरार आरोपीतांना मोक्का कायद्यांतर्गत केले कारवाईचे गुन्हयात अटक करुन त्यांना दि. २२/०१/२०२५ रोजी मोक्का कोर्ट शिवाजीनगर, पुणे येथे रिमांडकामी हजर करुन त्यांची दि. २७/०१/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आली आहे. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अश्विनी राख, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन श्री. राजेंद्र पन्हाळे, पोउपनि अनिल जाधव, पोलीस अंमलदार सातपुते, शिंदे, देवीकर, नागलोत, वाघमोडे, विर, कुदळे, पाटील, शिरगिरे, गाडे, कर्डीले. यांनी केली आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




