पोर्शे अपघात प्रकरण; बाल न्यायालय मंडळाच्या ‘त्या’ सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई होेणार

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला तीनशे शब्दांचा निबंध, तसेच वाहतूक पोलिसांबरोबर १५ दिवस काम करण्याच्या अटी, शर्तींवर जामीन मंजूर करणाऱ्या बाल न्याय मंडळातील दोन अशासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बाल कल्याण आयुक्तांनी केली आहे.

Advertisement

बाल न्याय मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने शंभरहून अधिक पानांचा अहवाल बाल कल्याण विभागाकडे नुकताच सादर केला. मुलाला जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत सदस्यांनी पुष्कळ चुका केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. संबंधित अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. बाल न्याय मंडळातील सदस्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जामिन देण्याच्या या निर्णयावर त्यावेळी टीका झाली होती. तसेच दोन जणांचा बळी गेलेला असतानाही जामीन मंजूर कसा केला गेला याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page