खडक पोलीसांची आणखी एक धडक कारवाई…
गोरगरिबा साठी असणारे रेशनिंगच्या धान्यावर काळाबाजार करणाऱ्या टोळीवर खडक पोलिसांची धडक कारवाई …
खडक पोलीस हद्दीमध्ये दिनांक ११/४/२०२३ दुपारी साडेबारा वाजता रेशनिंगचा माल भरून एक टेम्पो जात होता , सदर टेम्पो व माल याची चौकशी केली असता..तो माल अवैध आसल्यचे लक्षात येताच मालासह टेम्पो (MH 12PQ0582)ताब्यात घेतला . ज्यातून रेशनचा माल विविध रेशन केंद्रातून गोळा करुन खाजगी दुकानदाराना विक्रीसाठी पुरवला जात होता . आरोपी जावेद लालू शेख वय वर्ष 35 कासेवाडी, अब्बास अब्दुल कदर वय वर्ष 34, अशोक नगर कासेवाडी, इम्रान अब्दुल शेख वय वर्ष 30 गोल्डन जुबली कासेवाडी भवानी पेठ, अशा आरोपींना अटक केली यात एक टेम्पो सह मुद्देमाल जप्त केला आहे. सदर ची कारवाई महेश प्रकाश जाधव पोलीस शिपाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव, खडक पोलीस स्टेशन श्री. संपतराव राऊत पोलीस निरीक्षक,गणेश शाखा खडक पोलीस स्टेशन ,नितीन कुमार नाईक सहाय्य पोलीस निरीक्षक,खडक पोलीस स्टेशन एम. ए. काळे साहेब, पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली




