गुंड गजा मारणेसमोर चंद्रकांत पाटलांनी हात जोडले; व्हिडिओ व्हायरल

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्याचे गुंडांसोबत फोटो पाहायला मिळाले आहेत. शिवाय अनेक राजकारणी मंडळींनी कुख्यात गुंडांकडून सत्कारही स्वीकारले आहेत. काही महिन्यांपूर्वी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे यांच्याकडून सत्कार स्वीकारला होता. त्यानंतर लंकेंवर टीका झाल्यानंतर गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आता भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला आहे.

Advertisement

पुण्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. अनेक इच्छुक पुन्हा तयारीला लागले आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांची कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी आहे. यासाठी येथील कार्यक्रमात ते भेटी गाठी वाढवण्यावर भर देत आहेत. मंगळवारी देखील कोथरूड मधील एका दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी एका मंडळाला भेट दिली होती. या कार्यक्रमात गुंड गजा मारणे याने चंद्रकांत पाटील याची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ भेट देत स्वागत केलं. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे विरोधक चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.

कोण आहे गजा मारणे?

अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात कुख्यात गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली होती. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या असल्याचे बोलले जाते. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page