रासपचे अध्यक्ष जानकर यांना एकाने शिविगाळ केल्याचा आरोप; शहराध्यक्ष बालाजी पवार आक्रमक

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाने शिविगाळ केल्याचा आरोप रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशन येथे पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शिविगाळ केलेल्या व्यक्तीला ताब्यात घ्यावे. त्याचा शिविगाळ करण्याचा हेतू काय आहे, का शिविगाळ केली, याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी शहराध्यक्ष पवार यांनी केली आहे.

Advertisement

बालाजी पवार हे पुण्यातील बालाजीनगर परिसरातून रात्री 11 वाजता जात होते, त्यांच्या गाडीवर महादेव जानकर यांचा फोटो आहे. हा फोटो पाहून एका व्यक्तीने जानकर यांच्या नावाने शिविगाळ केली. तसेच त्याने बघून घेण्याची धमकीही दिली. आणि त्या व्यक्तीने तेथून पळ काढला, असा आरोप बालाजी पवार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने महादेव जानकर यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणीही पवार यांनी सरकारकडे केली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page