पोर्शे अपघातप्रकरणी प्रकरणात मोठी अपडेट, विशाल अगरवालसह 6 जणांचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे – पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्श कारन चालवता बाईकला धडक दिली, त्यामध्ये एक तरूण व एका तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला आता जवळपास चार महिने उलटून गेले असून अपघातास जबाबदार ठरलेला अल्पवयीन आरोपी हा बाल न्यायालयाने जामीन दिल्याने सध्या बाहेर आहे. मात्र त्याचे आई-वडील, शिवानी आणि विशाल अग्रवाल हे सध्या तुरूंगात आहेत. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळला. विशाल-शिवानी अग्रवाल यांच्यासह डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर, यासह २ आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र या 6 आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयाने जामीन फेटाळला.

Advertisement

दोन महिन्यांपुर्वी (दि. १९ मे ) मध्यरात्री अल्पवयीन कार चालक मुलाने आलिशान कारने दोन आयटी अभियंत्यांना उडवून त्यांचा बळी घेतला होता. याप्रकरणात ससून रुग्णालयात मुलाचे रक्त बदल केले. मात्र, हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात वडिल विशाल अगरवाल, मुलाच्या जागी स्वत:चे रक्त देणारी आई शिवानी तसेच डॉ. अजय तावरे व हाळनोर यांच्यासह ७ जणांना अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी ९०० पानांचे दोषारोपपत्र देखील न्यायालयात सादर केले आहे. दोषारोपपत्रानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. अर्जाला विरोध करत आरोपींनी गुन्हा घडल्याच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रांसह पुराव्यामध्ये छेड़छाड़ केली. त्यासोबतच नवीन पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाला योग्य तो निर्णय देण्यासाठी कायद्यानुसार पुरावा लागतो. न्याययंत्रणेशीच केलेला हा खेळ आहे. न्याययंत्रणेशी खेळणे हे अतिशय गंभीरतेने घेतले पाहिजे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींचा जामीन फेटाळला.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page