पार्क केलेल्या कारला अचानक लागली आग, पुण्यातील घटना

पुणे : पुणे शहरातील पद्मावती भागातील विणकर सभागृहाजवळ पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेले नाही.

Advertisement

विणकर सभागृहाजवळ रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारने पेट घेतल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी फोमचा वापर करून आग आटोक्यात आणली.

कारमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, गणेश भंडारे, जवान पंकज इंगवले, नीलेश राजीवडे, अभिषेक खाटपे, योगेश कुंभार, विनायक घागरे यांनी आग आटेक्यात आणली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page