विधी संघर्षीत बालकाचे ताब्यातुन एकुण ०६ दुचाकी वाहने केली जप्त..!

दि. ०१/०२/२०२५ रोजी मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शन प्रमाणे युनिट ०५ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांचे आदेशान्वये पोलीस अंमलदार विनोद शिवले, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, अकबर शेख व अमित कांबळे असे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत फिरत असताना पोलीस अंमलदार विनोद शिवले व अकबर शेख यांना मिळालेल्या बातमीवरुन त्यांनी एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करुन सदर मुलाने हडपसर, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ व दौंड परिसरातुन चोरलेल्या मोपेड व मोटरसायकल अशा एकुण १,७०,०००/- रुपयांचे एकुण ०६ दुचाकी वाहने जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेली आहेत. सदर जप्त करणेत आलेल्या वाहनांबाबत १) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १४३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) २) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) ३) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १४६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) ४) खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ०५/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) ५) विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२४ भादवि कलम ३७९ ६) दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण गुन्हा रजिस्टर ५२८/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अशी एकुण ०६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस केले आहेत. सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, सपोनि विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार विनोद शिवले, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, अकबर शेख, अमित कांबळे व उमाकांत स्वामी यांचे पथकाने केली आहे.

Advertisement

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page