मोठी बातमी ! माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

कोल्हापूर : किल्ले विशाळगडवर झालेल्या हिंसाचारानंतर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणानंतर विशाळगडच्या पायथ्याला आणि विशाळगडावर प्रचंड प्रमाणात तोडफोड, वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याने पंचक्रोशीमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. हिंसक घटनानंतर कोल्हापूर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीराजेंवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

Advertisement

500 लोकांवर गुन्हा दाखल

पोलिसांकडून 500 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्य तपासामध्ये आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

विशाळगडावर नेमकं काय घडलं?

काल विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी पुण्याच्या रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगड आणि विशाळगडच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलन झाली होती. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि ज्यांचा गडावरील अतिक्रमणाशी काही सुद्धा संबंध नाही अशा लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आल्यानंतर प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्यात आल्याने संताप निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलीस तपासामध्ये सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page