राज्याच्या कृषिमंत्र्यांच्याच जिल्ह्यात शेतकरी आक्रमक, आक्रोश मोर्चाही काढला

बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांती शेतकरी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. अनेक शेतकऱ्यांनी या आक्रोश मोर्चात सहभाग घेतला.

Advertisement

मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. हे अनुदान मिळावे या मागणीसाठी यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले. मात्र तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून शासनाचा आणि कृषीमंत्र्यांचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाल्या नाही, तर कृषिमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास 670 कोटी रुपये थकले आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page