पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, दोघांना नोकरी लावण्याचे आमिष दाखविले अन्…

पुणे : लंडनमध्ये नोकरी लावण्याचे दोघांना आमिष दाखवून त्यांच्याकडून १६ लाख १४ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पूर्णानगर, चिंचवड येथे घडला. याप्रकरणी श्वेतांक राजेंद्र शिंदे (रा. पसायदाननगर, वडगाव रोड, आळंदी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरीटकुमार कन्हैयालाल पटेल (वय ४३, रा. नक्षत्र फेज २, पूर्णानगर, चिंचवड), किरीटकुमार याचा अकाउंटंट गजानन भास्कर देशपांडे (वय ४२, रा. देशपांडे गल्ली, आष्टी) व दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी श्वेतांक शिंदे आणि त्यांच्या एका मित्राला लंडनमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवले. दोघांचा विश्वास संपादन करून त्यांना नोकरीसाठी डिपॉझिट रक्कम भरावी लागेल, लंडनमध्ये परमनंट व्हिसा काढण्यासाठी व लंडनमध्ये राहण्यासाठी घर भाड्याने घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी करत त्यांच्याकडून 16 लाख 14 हजार 21 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




