भोर तालुक्यात बारावीचा निकाल ९४.४३%…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा भोर तालुक्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे. मागील वर्षी ९४.५५ टक्के निकाल लागला होता तर यावर्षी ९४.४३ टक्के लागला असला तरीही विद्यार्थ्यांची संख्या मात्र घटली आहे.

गेल्या वर्षी बारावीला २ हजार १ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यावर्षी १ हजार ९७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

Advertisement

तालुक्यातील ७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. यामध्ये शिवाजी विद्यालय व ज्यु कॉलेज नसरापूर, जिजामाता ज्युनिअर कॉलेज भोर, अमृता विद्यालयम् नसरापूर, काशिनाथराव खुटवड कनिष्ठ महाविद्याल हातवे, क्रांतीवीर वासुदेव फडके स्मृती विद्यालय चिखलगाव, युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल नायगाव आदींचा समावेश आहे.याशिवाय व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचा निकालही १०० टक्के लागलेला आहे. यामध्ये राजा रघुनाथराव कनिष्ठ महाविद्यालय व्यवसायीक अभ्यासक्रम, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्यावसायीक अभ्यासक्रम, श्री शिवाजी सेकंडरी अॅड हायर सेकंडरी स्कूल, अनंतराव थोपटे महाविद्यालय, गर्ल्स ज्यु कॉलेज आदींचा समावेश आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page