कोंढव्यात दुचाकी स्लीप होऊन अपघात; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

पुणे – भरधाव दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू तर, पती जखमी झाल्याची घटना घडली. कोँढवा येथील टिळेकरनगर परिसरात हा अपघात झाला असून, दुचाकी चालक पतीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुनितादेवी विजयकुमार सिंग (वय ४८, रा. व्यंकटेश गॅलक्सी अपार्टमेंट, टिळेकरनगर, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात विजयकुमार शिवमंगल सिंग (वय ५४) जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार विजयकुमार यांच्यावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हवालदार बिपीन सूर्यवंशी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, विजयकुमार आणि त्यांची पत्नी पुनितादेवी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास टिळेकरनगर परिसरातून दुचाकीने जात होते. तेव्हा भरधाव दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे विजयकुमार आणि पुनितादेवी खाली पडले. पुनितादेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ससून रुग्णालयात दोघांना दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान पुनितादेवी यांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page