पुणे Porsche अपघातात धक्कादायक खुलासा…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- पुण्यातल्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालवत दोन इंजिनिअरना चिरडलं, यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे, पण याप्रकरणी आणखी काही धक्कादायक खुलासे होत आहेत.

Advertisement

अग्रवाल कुटुंबियांना पोलिसांचा वरदहस्त काही नवा नाही, अग्रवाल कुटुंबियांचे अंडरवर्ल्डसोबत संबध आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध होते. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अल्पवयीन कार चालक असलेल्या मुलाच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतल्याचं बोललं जातंय. याचसंदर्भात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक विजय पुरुषोत्तम साळवी, उर्फ विजय तांबट बँकॉकला भेट घेतल्याचा आरोप आहे.या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र याप्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असतानाही पुणे पोलिसांनी केवळ आयपीसी कलमं लावून गुन्हा दाखल केला. आरोपपत्र दाखल करेपपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page