राखीपौर्णिमेला अजित पवारांना राखी बांधणार का?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुणे : राखी पौर्णिमा हा सण जवळ आला आहे. येत्या १९ तारखेला राखी पौर्णिमा आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारा हा पवित्र सण. या सणाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का? हा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. कारण जुलै २०२३ पासूनच या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. आता रक्षाबंधन या दिवशी काय होणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे.
अजित पवारांना राखी बांधणार का? असे सुप्रिया सुळेंना विचारले असता त्यांनी ‘कळेल’, असं एका शब्दात उत्तर दिलं. तसंच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




