रांजणगाव परिसरात २१ बांगलादेशी नागरिकांना पकडले, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील नगर रस्त्यावरील रांजणगाव ओैद्योगिक वसाहत परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २१ बांगलादेशी नागरिकांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे वास्तव्य करण्यासाठी लागणारे कागदपत्रे सापडली आहेत. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (२४ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान (वय ५०), मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार (वय ३२) शफिकउल अलीमिया शेख (वय २०) हुसेन मुखिद शेख (वय ३०) तरिकुल अतियार शेख (वय ३८) मोहम्मद उमर फारूख बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख (वय ३२) शाहिन शहाजान शेख (वय ४४) मोहम्मद हुसेन शेख (वय ३२) रौफ अकबर दफादार (वय ३५) इब्राहिम काजोल शेख (वय ३५) फरीद अब्बास शेख (वय ४८) मोहम्मद सद्दाम अब्दुल सखावती (वय ३५) मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार (वय ३२) आलीमिया तोहकील शेख (वय ६०) मोहम्मद इसराईल फकीर (वय ३५) फिरोजा मुताकीन शेख (वय २०) लिपोया हसमुख मुल्ला (वय ३२) सलमा मलौक रोशन मलीक (वय २३) हिना मुल्ला जुल्फीकार मुल्ला (वय ४०) सोनदिप उर्फ काजोल बासुदिप बिशेश (वय ३०) येअणुर शहदाता मुल्ला (वय २५, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर,, मुळ रा बांगलादेश) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.
बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे रहिवासासाठी लागणारे कागदपत्रे सापडली असून, त्यांना कागदपत्रे कोणी दिली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




