आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा; उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांचे प्रमुख मार्गदर्शन

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? मोठा भाऊ कोण? कोण कुठून निवडणूक लढणार? अशा विविध प्रश्नांनी राज्याचं राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतला. तर दुसरीकडे काँग्रेसनं प्रचाराची धुरा मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आज (16 ऑगस्ट) मुंबईत पार पडत आहे.

Advertisement

या मेळाव्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याच मेळाव्यातूून महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचाराची धुराही सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंकडे जर निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली तर निव़णुकीच्या रिंगणात ठाकरे विरूद्ध फडणवीस आणि शिंदे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

याशिवाय, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडील इतर मित्रपक्षही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही एकजुटीने काम करण्यासाठी हा मेळावा होत आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page