पोलीस आयुक्त म्हणाले, आरोपीने ऑनलाईन पेमेंट केले यातून मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- एका बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्श कार चालवून मोटरसायकवर जाणाऱ्या एका तरूणाला आणि तरूणीला पुण्यातील कल्याणीनगर येथे भीषण धडक दिली होती.
या अपघातात ते दोघेही ठार झाले. या घटनेनंतर धक्कादायक खुलासे झाल्याने ही घटना राज्यातच नव्हे, तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी आरोपीच्या बारमधील व्हायरल व्हिडिओबाबत माहिती दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या अपघातातील आरोपी हा अल्पवयीन आहे, तसेच त्याचे वडील प्रसिद्ध बिल्डर असल्याने त्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाचे दारू सेवन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली.




