पोलिस ठाण्यात बिर्याणी, पिझ्झा पार्टी अपघाताच्या घटनेवर धंगेकरांचा गंभीर आरोप…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- पुण्याच्या कल्याणी नगर भागात मंद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवणाऱ्या एका बिल्डराच्या पोराने रविवारी दोघांना उडवल्याची घटना घडली होती.
हा अपघात इतका भीषण होता की मृत दोघेजण दुरवर फेकले गेले होते आणि रस्त्यावर आपटून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर १४ तासांत अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. या जामीनावरून आता आश्चर्य व्यक्त होतं आहे. असे असताना आता पुण्याच्या या अपघाताच्या घटनेवर रविंद्र धंगेकर प्रचंड आक्रमक झाले आहेत. धंगेकर यांनी एक्सवर भली मोठी पोस्ट टाकून आता कारवाईची मागणी केली आहे. रविंद्र धंगेकर यांनी पैशाव्याल्यांची औलाद अशी मस्ती करणार असेल त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहेत. यासोबत येरवडा पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.
रविंद्र धंगेरकरांची पोस्ट जशीच्या तशी
कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही.
या घटनेतील दोषी :
1) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे.
2) अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब, Ballr पब या सर्व पब मालकांवर अटकेची कारवाई करून त्यांची पब कायमस्वरूपी बंद केले पाहिजे.




