मतदानापूर्वी नाट्य; पैसे वाटपावरून काँग्रेस, भाजपचे आरोप प्रत्यारोप…

पुणे : लोकसभा मतदार संघातील सहकारनगर, शिवदर्शन भागात पैसे वाटपाचा आरोप करून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

Advertisement

काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी वस्ती भागात पैसे वाटप करण्यात आल्याचे आरोप केले. तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. धंगेकरांनी पैसे वाटप केल्याचा आरोप घाटे यांनी केला आहे.पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता शनिवारी झाली. रविवारी रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागात पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात असताना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. शिवदर्शन, सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.

त्यानंतर धंगेकर रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जाब विचारला. पोलीस ठाण्याच्या आवारात धंगेकर आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पैसे वाटप करण्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page