गुन्हा उघडकीस आणुन एका आरोपीस केले जेरबंद..!

वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७१५/२०२५ भा.न्या.सं.क. ३२४(४), १८९(२), १९०, १९१ (३) आर्म अॅक्ट क. ४ (२५), महा. पो. का. क ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमें. क.३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथक पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे व मंगेश जाधव यांनी गोपनीय बातमीव्दारे आरोपीचा शोध घेवून विजय ऊर्फ सुमित अनिल जगधने वय १९ वर्षे, रा. एस. के. चिकन सेंटर, वाघेश्वरनगर, वाघोली, पुणे यास ताब्यात घेवून अटक केली. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने त्याचे चार अल्पवयीन मुलांसोबत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीकडुन ऊस तोडीचे लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले आहे. तसेच चार विधीसंघर्षीत बालकांना मा. बाल न्यायमंडळ येरवडा पुणे यांचे आदेशान्वये निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर श्रीमती नूतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे व गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page