गंज पेठेत प्रेयसीच्या बहिणीवर गोळीबार…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- शहरात एकीकडे गुन्हेगारांची झडती घेतली जात असताना दुसरीकडे गोळीबाराच्या घटना मात्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. प्रेयसीने संपर्क तोडल्याने तरुणाने तिच्या बहिणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गंज पेठेत घडली.

Advertisement

या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. खडक पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. ऋषी बागूल आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 18 वर्षीय तरुणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंज पेठेत ही घटना घडली. तक्रारदार तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत. तसेच त्यांचा पत्रावळ्या आणि द्रोण तयार करण्याचा व्यवसाय आहे.आरोपी ऋषी बागूलचे तिच्याशी प्रेमसंबंध आहेत. कुटुंबीयांना याबाबतची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. वाद झाल्यानंतर बहिणीने आरोपी ऋषीशी संपर्क तोडला. त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता. ऋषी त्याच्या मित्रासोबत प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंज पेठेत आला. त्याने घराचा दरवाजा जोरात वाजवून प्रेयसीला भेटायला बोलाविले. ती घरी नव्हती. तक्रारदार तरुणी आणि तिच्या मावस बहिणीने याबाबतची माहिती ऋषीला दिली. त्यानंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.तरुणीला बहिणीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला लावला.

तेव्हा तिने बिल न भरल्याने मोबाईलवरून संपर्क साधता येणार नाही, असे ऋषीला सांगितले. तिने बहिणीला संदेश पाठविला. तेव्हा बहिणीने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर ऋषी चिडला आणि त्याने तक्रारदार तरुणीवर पिस्तूल रोखले. तिच्या दिशेने पिस्तुलातून एक गोळी झाडली. तक्रारदार तरुणी अणि तिची मावस बहीण तेथून पळाल्या. गोळीबारानंतर ठिणगी उडाल्याने तरुणीच्या मावस बहिणीला किरकोळ दुखापत झाली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page