धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक

पुणे : अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या गाडीचा अपघात झाला. त्यांची गाडी आणि ट्रॅव्हल बस यांच्या भीषण धडक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी राजश्री मुंडे यांच्या कार आणि ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. यात राजश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की धनंजय मुंडेंच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. तर बसच्या पाठीमागील भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात सध्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या याबाबत अधिक तपास सुरु आहे.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या बीडहून मुंबईकडे जात होत्या. त्याचवेळी सोरतावाडी या ठिकाणी एका खासगी ट्रॅव्हल्सला त्यांच्या कारने मागून धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर राजश्री मुंडे या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




