कोयत्याने वार करणारेस केले जेरबद्ध…
कोंढवा पोलीस स्टेशन गु. नं.५०८/२०२४ मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन यांनी आदेशित केल्याप्रमाणे आज दिनांक ०८/०५/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन गु नं.५०८/२०२४ भा.द.. आर्म अॅक्ट ४(२५)
मधील आरोपी हे अश्रफ नगर कोंढवा येथे थांबले असल्याची माहिती बातमी दारा मार्फत मिळताच पोलीस हवालदार अमोल हिरवे व पोलीस शशांक खाडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोपींना ताब्यात घेतले सदर आरोपीची नावे १.. अमन मोहम्मद भगवान (२० वर्ष) राहणार अश्रफ नगर कोंढवा २. मुसामा अब्दुल हाश्मी सलाम वय वर्ष 22 राहणार मोमीनपुरा खडक पुणे ३. मास शब्बीर शेख वय वर्ष 22 राहणार मोमीनपुरा खडक पुणे याप्रमाणे आरोपी असून यांनी फिर्यादीस कोयत्याने जखमी करून त्यांचे पान टपरीचे नुकसान केल्याबाबत कबुली दिली . सदर कामगिरी माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त मा मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मा ए राजा पोलीस पोलीस उपायुक्त परिमंडळ ५. मा गणेश इंगळे मा सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे माननीय संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन माननीय मानसिंग पाटील साहेब निरीक्षक गुन्हे शाखा कोंढवा यांचे मार्गदर्शनाखाली श्री लेखाची शिंदे सह पोलीस निरीक्षक श्री बालाजी डिंगोळे पोलीस उपनिरीक्षक अमोल हिरवे पोलीस हवा राहुल वंजारी पोलीस अंमलदार अभिजीत रत्नपारखी पोलीस अंमलदार सुहास मोरे तसेच थोरात अक्षय शेंडगे गरुड भोसले विकास मरकळे रास गे शशांक खाडे कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे
जनहक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




