घरफोडी चोरीचे गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात केले जेरबंद..!

दिनांक २४/०४/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी वपोनि श्री. नंदकुमार बिडवई, सपोनि प्रविण काळुखे, पोलीस अमंलदार पठाण, राठोड, पाटील व घरफोडी पथकातील पो. अंमलदार खरात, तेलंगे, पठाण असे कोंढवा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं.३३२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्टाफ मधील घरफोडी पथकातील पो. अंमलदार खरात व पठाण यांनी सीसीटीव्ही फुटेज व त्यांचे बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी प्रमाणे त्यांनी इसम नामे फिरोज मोहम्मद शेख वय ४३ वर्षे रा. गल्ली नं १, अशरफनगर, कोंढवा, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक तपास करता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट, घरफोडी चोरी करीता लागणारे साहित्य असा एकुण ८,८६,२००/-किं.रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यास पुढील कारवाई करीता कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २.श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, श्री.नंदकुमार बिडवई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २. श्री. संदीपान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व पोलीस अंमलदार जहांगिर पठाण, खरात, तेलंगे, इरफान पठाण, प्रदीप राठोड, गणेश ढगे, मनिषा पुकाळे, महेश पाटील, यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page