रात्रीचा प्रवास करता, सावधान ,रोडला बेसावध पणे चालणाऱ्यांवर लूटमार करणाऱ्या वर खडक पोलिसांची करडी नजर…


रात्रीच्या वेळी बेसावधपणे चालणारे प्रवासी यांना लुटणाऱ्या टोळीला खडक पोलिसांनी केले जेरबंद…
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवासांना लुटणारे काही लुटारू यांचा माघ काढत खडक पोलिसांनी 8 मोबाईल चोरांकडून जप्त केले.
फिर्यादी करून बुद्धी शेख हक वय 33 वर्ष धंदा फळ विक्री (व्यवसाय). 25 नंबर गोडाऊन केळी मार्केट मार्केट यार्ड पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी रोड पुणे येथून एका अनोळखी व्यक्तीने धमकावून त्यांच्याशी झटापट करून मोबाईल हिसकावून घेऊन तसेच 2500 रोख रक्कम, बोटातील सोन्याची अंगठी हिसकावून घेतली अशी तक्रार खडक पोलीस स्टेशन मध्ये 143/२०२३ कलम 392 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे पदाचारी व्यक्तीस धमकावून लुटण्याचा प्रकार घडल्याने त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव यांनी तत्काळ दखल घेऊन श्री संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे यांचेमार्फत तत्काल दोन तपास पथके तयार करून त्यांना तपासाबाबत योग्य ती सूचना दिली देण्यात आल्या तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव यांनी तपास पथकास दिलेल्या सूचनांप्रमाणे तपास पथकातील अंमलदार संदीप तळेकर मंगेश गायकवाड अक्षय कुमार वाबळे हे गस्त करीत असताना त्यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की जबरी चोरी करणारा इसम हा गाडीखाना चौक मंडई येथे आला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन जबरी चोरी करणारा आरोपी सजाद मोहम्मद हनीफ शेख 42 वर्ष इंद्रायणी कॉलनी कामशेत पुणे सध्या राहणारा लोहिया नगर पेट्रोल पंप जवळ पुणे फिरताना या सापळा रचून सीताफिने ताब्यात घेण्यात आले पुण्यातील अटक आरोपी सजाद मोहम्मद हनीफ शेख वय 42 वर्ष याचे कडून गुन्हा जबरी चोरी केलेली 2500 रुपये रोख रक्कम 12000 किमतीचा एक विवो कंपनीचा क* रंगाचा मोबाईल पंधरा हजार किमतीची एक सोन्याची अंगठी अंदाजे अडीच ग्रॅम वजनाची अशी मालमत्ता जप्त करण्यात आली याव्यतिरिक्त अटक आरोपीकडून ओप्पो कंपनीचे चार मोबाईल विवो कंपनीचे दोन मोबाईल वन प्लस कंपनीचा एक मोबाईल असे एकूण 96 हजार किमतीचे सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने अधिक तपास चालू आहे अशा प्रकारे अटक आरोपीकडून एकूण एक लाख 25 हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पुढील कारवाई श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त श्री प्रवीण पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री संदीप सिंह गेल पोलीस उपयुक्त परिमंडळ एक पुणे व श्री सतीश गोवेकर सह पोलीस आयुक्त कारखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीमती संगीता यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक.श्री .संपतराव राऊत पोलीस निरीक्षक. पुणे.श्री.राकेश जाधव सहा पोलीस निरीक्षक श्री.अतुल बनकर ,पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार .अजित संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे ,लखन डावरे ,मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, सागर कुडले अक्षय कुमार वाबळे नितीश नितीन जाधव महेश पवार स्वप्निल बांधव यांचे पथकाने केली आहे.
खडक पोलीस स्टेशन या कामगिरीमुळे प्रवासी यांना सुटकेचा विश्वास मिळाला.

Advertisement

जन हक्क times पुणे
प्रतिनिधी :- आरती बाबर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page