पुण्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या भंगार विक्रेत्याला खडक पोलीसांकडून अटक

पुणे : दि. १६. पुण्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या भंगार विक्रेता मोबीन सुलतान खान (वय – २७ रा. गल्ली नं. ३, पीएमसी कॉलनी, दापोडी, पुणे याला खडक पोलीसांनी अटक करून त्याचा कडून चोरीच्या तीन मोटारसायकल जप्त केल्या असून खडक पोलीस स्टेशन, चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन आणि समर्थ पोलीस स्टेशन येथे तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर कारवाई ही माडीवाली कॉलनी येथे करण्यात आली.

Advertisement

पोलीससूत्रानुसार खडक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक स्थापन करण्यात आले होते. पेट्रोलींग पोलीस अंमलदार किरण ठवरे व हर्षल दुडम यांना माहिती मिळताच या पथकाने सापळा रचून मोबीन खान याला चोरीच्या मोटारसायकलसह पकडले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलची चौकशी केली असता त्याने लोहीयानगर येथून चोरल्याचे सांगितले. खडक पोलीस स्टेशन हद्दीतून दहा ते पंधरा दिवसांपूर्वी बी.पी. लोहीयानगर भागातून हिरो होंडा सी.डी. डीलक्स (एमएच १२ एच आर २७०९) दुचाकी चोरणारा सुशील लॉज जवळ असल्याचे समजल्याने तसेच मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडे सखोल चौकशी केल्याने त्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून ५२ हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल जप्त केल्या आहे. अधिक तपास खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, लखन ढावरे ल,रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, महेश जाधव आणि तुळशीराम टेंभुणे करित आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page