मोक्का गुन्हयात १ वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपीस व त्यास आसरा देणारा इसमास केले जेरबंद..!

मा. वरिष्ठांनी पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.
वानवडी पोलीस स्टेशन गु.रं.नं. ५२६/२०२५ भा.न्या.सं.क १०९,११५(२),१८९(२),१८९(४),१९०, १९१(१),१९१ (२),१९१ (३), ३५२ सह आर्म अॅक्ट ४ (२५) सह महा. पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (i),३ (२), ३ (४) या गुन्हयामधील सुमारे ०१ वर्षापासुन पाहिजे असलेले आरोपी रोहीत भारत गायकवाड, वय २५ वर्षे, रा. सर्वे नं. १०६ गोसावी वस्ती, हडपसर, पुणे हा पाहिजे आरोपी होता. सदर आरोपी हा वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडील अभिलेखावरील आरोपी नामे ऋतिक ऊर्फ काल्या रणजित रावळकर, वय २६ वर्षे, रा. कन्नडवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे याच्याकडे वास्तव्य करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट ५ पथकाकडील टिमने कन्डवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे या ठिकाणी जावुन आरोपी नामे रोहीत भारत गायकवाड याचा शोध घेतला असता, तो इसम नामे ऋतिक ऊर्फ काल्या रणजित रावळकर, वय २६ वर्षे, कन्नडवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे याचे राहत्या ठिकाणी मिळुन आला. नमुद गंभीर गुन्हयात पाहीजे आरोपी आहे हे माहीत असतानाही त्यास इसम नामे ऋतिक ऊर्फ काल्या रणजित रावळकर, वय २६ वर्षे याने आसरा दिल्याचे निष्पन्न झालेले आहे. आरोपीतांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी वानवडी पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५, कडील पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, शहाजी काळे. अमर चव्हाण, परमेश्वर कदम, शशिकांत नाळे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सुधीर सोनवणे स्वाती तुपे, जयदेव भोसले, नेत्रिका अडसुळ, नासेर देशमुख महिला पोलीस अंमलदार मयुरी पालवे यांचे पथकाने केली आहे.




