पुणे- सोलापूर महामार्गावर धावत्या बसने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी नाही

पुणे : सोलापूर महामार्गावर कदम वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे. सदरची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बस मध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करीत होते. सर्वजण सुखरूप आहेत. या आगीत बसचे मोठ्या प्रमाणावर पूर्ण नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या वेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता. कदम वस्ती ग्रामपंचायत या ठिकाणी गाडीचा टायर फुटला त्यानंतर गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

Advertisement

बसने पेट घेतला तेव्हा वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना आरडाओरडा करत खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर काही क्षणात संपूर्ण बस पेटली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे धाव घेतली. लगेचच त्यांनी आग आटोक्यात आणली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page