रेकार्डवरील पाहिजे असलेल्या गुन्हेगारास केले जेरबंद..!

दि.०१/०७/२०२६ रोजी महिला पोलीस उप निरीक्षक तेजश्री पवार, व स्टाफ असे गुन्हे शाखा युनिट २ हददीत गुन्हे प्रतिबंधक गस्त व पाहिजे फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना बातमी मिळाली की मांजरी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गु.र.नं २६/२०२६ शस्त्र अधिनियम ३ (२५) मधील पाहिजे फरारी आरोपी प्रथम ऊर्फ पॅडी सुरेश म्हस्के हा निलायम टॉकीजवळ पर्वती पुणे या भागात फिरत आहे. सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल खिलारे यांना कळवली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केलेने लागलीच सदरचे पथक हे बातमीच्या ठिकाणी गेले असता मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने संशयित इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. सदर इसमांस नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रथम ऊर्फ पॅडी सुरेश म्हस्के वय २२ वर्ष रा. स न १३२ पर्वती पायथा ढमढरे गॅस एजन्सी जवळ सिंहगड रोड पुणे असे सांगीतले. त्यानंतर मांजरी पोलीस स्टेशन येथे सदरबाबत खात्री केली असता तो नमुद गुन्हयात पाहिजे आरोपी असलेबाबत सांगितले. सदर आरोपीस मांजरी पोलीस स्टेशन येथे हजर केले असता मांजरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २६/२०२६ शस्त्र अधिनियम ३ (२५) मध्ये अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीवर रेकार्डवरील गुन्हेगार असुन खुनाचा प्रयत्न तसेच शरीराविरुध्द १७ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, मपोउपनि तेजश्री पवार, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, विशाल दळवी, ऋषिकेश व्यवहारे, उज्चल मोकाशी, सर्जेराव सरगर, संतोष टकले, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, शंकर कुंभार, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, अजीम शेख, ओमकार कुंभार, सददाम तांबोळी महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे तसेच विदया शिंदे यांनी केली आहे.




