मोलकरणीने वृध्द महिलेचे लंपास केलेले ०७ लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे पोलीसांनी केले हस्तगत..!

दिनांक १६/०६/२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन येथे यातील फिर्यादी यांनी त्यांचे घरातील वृध्द आईचे सोन्याचे दागिणे चोरी झाले बाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३०६/२०२६ भा.न्या.सं.क.३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांनी तपास पथकाचे पोलीस उप- निरीक्षक नितीन राठोड यांना तपास करण्याकरीता आदेशित केले होते. दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान फिर्यादी यांचे घरी घरकामाला असलेली महिला नामे अनिता रामचंद्र सुतार वय ४५ वर्ष रा. मुळेगाव ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर हिस ताब्यात घेवुन तिच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करता दाखल गुन्हा तिने केला असल्याचे कबुल केले. दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये नमुद महिला आरोपी हिने चोरी केलेले ७,००,०००/-रु.किं.चे फिर्यादी यांचे सोन्याच्या बांगड्या व चांदीचे ग्लास, निरंजन असे पुणे व सोलापुर येथुन हस्तगत करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक, कांतीलाल गुंड हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि-७ पुणे शहर (अतिरीक्त चार्ज), श्री. प्रशांत अमृतकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग (अतिरीक्त चार्ज) पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. महेश बोलके यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, कांतीलाल गुंड, पोलीस अंमलदार प्रियंका काळे, अंबादास चव्हाण, राहुल जोशी, सचिन मांजरे, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार, लालु क-हे, अंकुश जोगदंडे, दिगंबर गोरे, राजीव टोंम्पे, सना शेख व आशा धादवड यांचे पथकाने केली आहे.




