खूनाच्या गुन्हयाचा कट रचनारे आरोपींना शस्त्रासह केले जेरबंद

दि.०७/०५/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ७ कडील पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस अंमलदार निलेश साळवे व प्रशांत कापुरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी नामे १) प्रकाश ऊर्फ दीपक शंकर चव्हाण, वय २४ वर्षे, रा. माळआळी, लोहगाव, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील अल्टो कार मधुन धारदार हत्यार जप्त केले आहे.
त्यानंतर गुन्हे शाखा युनिट ७ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व सपोनी मदन कांबळे यांनी युनिट कडील पथकासह आरोपीकडे सखोल तपास करता आरोपीला सदरची हत्यारे व कार त्याचा मित्र २) अनिकेत रामचंद्र चव्हाण वय २५ वर्षे, रा.मु. पो. विर, ता. पुरंदर, जिल्हा पुणे, सध्या रा. गोसावीवस्ती स.नं. १०६ वैदुवाडी हडपसर पुणे व त्यांचा इतर एक साथीदार यांनी पुरवली होती. त्यांचे मांडकी, ता. पुरंदर येथील राहणारे दोन इसम यांचेसोबत असलेल्या पुर्ववैमनस्यातुन व आरोपी प्रकाश चव्हाण याचेविरूद्ध दाखल केलेल्या गुन्हयाचा बदला घेण्यासाठी त्यांचा साथिदार ३) आकाश दिपक धनवटे ऊर्फ भावडी, वय २० वर्षे रा. आदर्शनगर, लेन नंबर २, लोहगाव, पुणे याचेसह सर्वांनी मिळुन हत्येचा कट रचला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी अनिकेत रामचंद्र चव्हाण यास ताब्यात घेवुन त्याची घरझडती मधुन ०२ तलवारी, बेस बॉल स्टीक व लाकडी दांडके जप्त केले आहेत. सदरबाबत लोहगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चेकलम ५५,६१ व भा. हत्यार कायदा कलम ४ (२५), व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपींना ताब्यात घेवुन वेळीच कारवाई करून खुनाचा कट उध्वस्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात तीन आरोपींना अटक करून एकुण २,२२,८००/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त आ.वा.सा.अति कार्यभार गुन्हे पुणे शहर श्री विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे -२ पुणे शहर श्री राजेंद्र मुळीक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संतोष सोनवणे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो. निरी. मदन कांबळे, पोलीस अंलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, निलेश साळवे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितीन धाडगे, किरण पलांडे, समाधान पाटील, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली




