पिएमपिएलला कार घासली शिवाजीनगर संचेती चौकात झाला अपघात..!

मोबाईल फोन चोरी करणा-या सराईत चोरटयास केले जेरबंद
दि.२७/०४/२०२६ रोजी रात्रौ १०/०० वा चे सुमारास यातील फिर्यादी यांचा गौरीज तवा तडका हॉटेल, सही अपार्टमेंट, एच.डी.एफ.सी. बँके समोर, साळुंखे विहार रोड, कोंढवा पुणे येथे मोबाईल फोन एका इसमाने चोरी करून नेलेबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे गु.र.नं. ३८१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकातील पोलीस अंमलदार चव्हाण व हिरवे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “एक निळ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला इसम पारसी मैदानाजवळ, शिवेनरीनगर, कोंढवा, पुणे एका पिशवीमध्ये चोरीचे मोबाईल घेवुन विक्री करणेकरीता गि-हाईक शोधत आहे” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे उमर सलीम शेख वय-२१ वर्षे, रा. फ्लॅट नं.१०२ शिवनेरी टॉवर, गल्ली नं. २३ शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे यास ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असता त्याचेजवळ असलेल्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला लाल रंगाचा रेडमी नोट १४ एस.ई. मॉडेलचा मोबाईल फोन व कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४४/२०२६ भा.न्या.सं.क ३०३ (३) प्रमाणे दाखल गुन्हयातील मोबाईल फोन चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीत यांचेकडुन अद्याप पर्यंत एकुण १,५०,०००/- रू किंमतीचे एकुण ११ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. खालील मोबाईल फोन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, मेमाणे, अमोल हिरवे, सचिन कोकरे, पुष्पेंद्र चव्हाण, केशव हिरवे, प्रशांत खाडे, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, अमित सुर्यवंशी, रियाज पटेल, राहुल शेलार, रशिद शेख, ओंकार शेटे, रासगे, शाहिद रजपुत यांनी केली आहे.




