भाजप आ.योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेल्या मामाचा आढळला मृतदेह…
मृत सतीश वाघ यांचे सकाळी झाले होते अपहरण

पुणे: भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा मृतदेह पुणे ग्रामीण मधील यवत परिसरामध्ये आढळला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अपहरणकर्त्यांकडून त्यांची हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे आज (दि.९) सकाळी अपहरण झाले होते. नेहमीप्रमाणे हडपसर भागातील ब्लूबेरी हॉटेल जवळ त्यांच्या निवासस्थानावरून ते व्यायामासाठी गेले होते. पहाटे सव्वाचारच्या सुमारास चार अपहरणकर्त्यांनी चारचाकीमधून त्यांचे अपहरण केले होते. दिवसभर पोलिसांकडून तपास सुरू होता.
आज सकाळी नेहमीप्रमाणे माझे काका व्यायामाला गेले होते. त्यांचे कुठलेही इथल्या कुठल्याही व्यक्तीशी भांडणं नाही. आमचा कुणावरही संशय नाही. मात्र, अचानक ही घटना घडलेली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे पुतणे मोहन वाघ यांनी दिली आहे.
कोण होते सतीश वाघ ?
सतीश वाघ यांचे शेवाळवाडी भागातील ब्लूबेरी नावाचे हॉटेल असून त्यांची या भागात शेती आहे. आज सकाळी साडेपाचच्या सुमारास फिरायला गेल्यानंतर सतीश वाघ यांचे चार जणांकडून आपहरण करण्यात आले होते. आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास यवत भागात एक मृतदेह सापडला असून तो सतिश वाघ यांचा असल्याचे म्हटले आहे. वाघ यांची लोणी काळभोर भागात शेती असून त्याचा न्यायालयात वाद सुरू आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




