जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षथॉन मॅरेथॉन चे आयोजन..!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फिटनेस फस्ट इंडिया, पुणे शहर पोलीस आणि वनविभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने Run For Environment हे ब्रिदवाक्य घेऊन ‘वृक्षथॉन मॅरॅथॉन’ चे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅरेथॉनची सुरुवात शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदानातून झाली.
पर्यावरण संवर्धन, झाडांची लागवड आणि आरोग्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेसाठी तब्बल ११,२०० धावपटूंनी नोंदणी केली होती.
सदर मॅरॅथॉनमध्ये २१ कि.मी,१० कि.मी, ५ कि.मी आणि ३ कि. मी अशा विविध अंतरांच्या शर्यती घेण्यात आल्या. सकाळी ०५.०० वाजता २१ कि.मी शर्यतीला सुरुवात झाली. यानंतर उर्वरित शर्यती टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संजय दराडे, गृहम फायनान्सचे श्री. मनीष जैस्वाल, एम. क्युअरचे श्री. राजेश नायर, श्री. आनंद नाईकनवरे यांनी धावपटूंना झेंडा दाखवून शर्यतीला प्रारंभ केला.
पोलीस मुख्यालय ग्राउंडपासून विद्यापीठ चौक पाषाण बावधन या मार्गावर धावपटूंनी पर्यावरण आणि आरोग्याविषयी जनजागृती करत उत्साहात सहभाग नोंदवला. प्रत्येक सहभागी धावपटूंना मेडल, प्रमाणपत्र आणि देशी झाडांचे रोपटे भेट देण्यात आले.
सदर मॅरॅथॉनचे वैशिष्ट म्हणजे राज्य शासनाच्या पोलिस आणि वनविभाग या दोन विभागांनी वृक्षथॉन फाउंडेशनसोबत एकत्र येऊन आरोग्य व पर्यावरण जागृतीसाठी एकत्रितपणे मॅरॅथॉनचे आयोजन केले. चितळे बंधू, पंचशील, बजाज, Emcure, अॅक्सिस बँक, भारती विद्यापीठ, गृहम फायनान्स, आदर पूनावाला संस्था, भारती हॉस्पिटल, मॉडर्न व फर्ग्युसन कॉलेज फिजिओथेरपी विभाग इ. अनेक संस्था व त्यांचे कर्मचारी, तसेच पुण्यातील विविध धावपटूंचे गट मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा. विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा, मा.सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संजय दराडे, मुख्य वनसंरक्षक श्री. आशिष ठाकरे, यांच्या हस्ते पार पडला. पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना १ लाख रुपये आणि कायनेटिक कंपनी तर्फे EV दुचाकी, आणि इतर गटातील विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आली.
या मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस आणि वनखात्यातील अधिकारी, कर्मचारी, तसेच विजय गायकवाड, अभिजित ढेरे, साहिल शहा, विष्णु ताम्हाणे, आरजू जैन, श्रेया बराटे, प्रफुल्ल संचेती, संतोष मोरे, पियुष लुणावत आणि वृक्षथॉन फाउंडेशनचे स्वयंसेवक व पुण्यातील विविध रनिंग ग्रुपच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.




