लोणवळयातुन टेम्पो चोरट्यास केली अटक व टेम्पो घेतला ताब्यात..!

दि.२२/०८/२०२५ रोजी २०/०० वा. ते दि.२३/०८/२०२५ रोजी सकाळी १०/३० वा. चे सुमा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, अण्णाभाऊ साठे उद्यानसमोर रामटेकडी, हडपसर, पुणे येथुन फिर्यादी यांचा एकुण २,५०,०००/-रु.कि.चा अशोक लेलँन्ड कंपनीचा दोस्त मिनी टेम्पो यास लॉक व पार्क केलेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे परवानगीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वानवडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक महाडिक व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन त्याचा तपास चालु केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले व दिपक क्षीरसागर यांना मिळालेल्या बातमीवरुन दि.२३/११/२०२५ रोजी कैलासनगर, लोणावळा, पुणे ग्रामीण येथे रोडच्या बाजुला टेम्पो थांबलेला आढळुन आला. असता सदर पोलीस पथक यांनी सापळा रचुन सदर ठिकाणी एक इसम आसता तो टेम्पो चालु करुन निघण्याचे तयारीत असताना त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याचे नाव गणेश शंकर पवार, वय-२५ वर्षे, रा. कैलासनगर, नवाज शेख यांचेकडे भाडयाने, नदीच्या जवळ, लोणावळा, जि. पुणे असे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने सांगितले की, सुमारे तीन महिन्यापुर्वी आरोपी व त्याचा साथीदार यांनी मिळून सदर टेम्पो चोरी करुन लोणावळा येथे घेऊन आलो व त्याचा भंगार वेचण्यासाठी वापर करीत होतो असे कबुल केले असता नमुद आरोपीचे ताब्यातुन २,५०,०००/- रु.कि.चा एक आयरीश ग्रीन रंगाचा अशोक ले लँन्ड कंपनीचा दोस्त मिनी टेम्पो हा जप्त केला व सदरचा वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी याचा पोलीस शोध चालु आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस स्टेशन कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विजयकुमार डोके, यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे व दिपक क्षीरसागर यांचे पथकाने केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page