कोम्बींग गस्त मोहीमे दरम्यान गुन्हेगारांवर धडक कारवाई..!

कोम्बींग गस्त मोहीमे दरम्यान गुन्हेगारांवर धडक कारवाई
अमरावती ग्रामीण जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम, भा.पो.से. यांच्या आदेशान्वये विशेष कोंबिंग ऑपरेशन व गस्त मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहिमेमध्ये ५२ पोलीस अधिकारी व २६२ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी पॉईंट उभारण्यात आले होते. तसेच माहितीगार गुन्हेगार, फरार आरोपी, मालमत्तेविषयक गन्हेगार यांची पडताळणी करण्यात आली. बस स्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, लॉज व धाब्यांची तपासणी करण्यात आली.
सदर मोहिमेदरम्यान एकूण ९४९ वाहनांची तपासणी करण्यात आली असून २११ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण रु. ६९,८००/- दंड वसूल करण्यात आला.
पोलीस स्टेशन वरुड हद्दीत आरोपी सोहेल शहा उर्फ बाबा उमर शहा, रा. वरुड तसेच पोलीस स्टेशन शिरखेड हद्दीत आरोपी बाबू उर्फ प्रवीण रामदास वाटकर, रा. नेर पिंगळाई यांच्या ताब्यातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्यांचेविरुद्ध कलम ४/२५ शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
तसेच NDPS कायदयान्वये प्रमाणे एमडी पावडर बाळगणा-या इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन चांद्र बाजार हद्दीत छापा कारवाई करण्यात आली. आरोपींची नावे १) अनवेज शहा शरीफ शहा, वय १८ वर्षे, रा. इस्लामपुरा, चांदर बाजार २) फिदा हुसेन उर्फ राजा झाकीर हुसेन, वय २२ वर्षे, रा. कसाबपुरा, चांदुर बाजार ३) साद अहमद मुस्ताक अहमद, वय १८ वर्षे, द्धा. इस्लामपुरा, चांदुर बाजार यांचे ताब्यातुन वलगाव ते चांदुर बाजार रोडवरील ग्राम खरवाडी येथील पंडलिक बाबा मंदिरासमोरील रोड. येथे प्रत्येकी ०२.४५० ग्रॅम, ०२.०७० ग्रॅम व ०२.६७० ग्रॅम अशा एकूण ०७.१९० ग्रॅम एमडी पावडर किंमत रु. २८,७६०/- व गन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन बजाज पल्सर-१२५ क्र. MH-27-DQ-2245 किंमत रु. ७०,०००/- दोन मोबाईल फोन किंमत रु. २०,०००/- असा एकूण रु. १,०८,७६०/-किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ३१ गुन्हे नोंदवुन अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली तसेच नोंद करण्यात आले. रात्रीच्या वेळी संशयितरित्या फिरणा-या इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये ११ कारवाया करण्यात आल्या. त्याचप्रमाणे गैरजामिनपात्र १७ व स्टैंडिंग वॉरंटमधील ४ अशा एकूण २१ वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.
सदर मोहिमेदरम्यान १ फरार आरोपी तसेच पूर्वीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांचे आदेशान्वये यापुढे सुध्दा जिल्ह्यातील गुन्हेगारांवर अंकश ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कोंबिंग ऑपरेशन नियमितपणे राबविण्यात येणार आहे.
वरील कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड ! यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार व अधिकारी/अंमलदार यांनी पार पाडली




