दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारे गुन्हेगार अटकेत; काळेपडळ पोलिसांची कारवाई

पुणे – गुन्हेगारीतील क्रेझ तसेच परिसरात दहशत बसविण्यासाठी अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या मित्राला थरारक रित्या सापळा लावून जेरबंद करण्यात आले. काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांनी हे पिस्तूल कोठून आणले, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. रितेश बाबासाहेब कसबे (वय १८, रा. महंमदवाडी रोड, हडपसर) तसेच राहुल संजय चौधरी (वय २१, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक अमित शेटे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पथकाला माहिती मिळाली की, एका रुग्णालयाच्या पाठिमागील बाजूस सराईत गुन्हेगार रितेश व त्याचा मित्र राहुल चौधरी हे दोघे काही तरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असून, त्यांच्याजवळ घातक शस्त्र आहेत. त्यानूसार, पथकाने या परिसरात सापळा लावला. मात्र, चाहूल लागताच दोघेही घाबरले. पथकाने त्यांना पकडले आणि त्यांची झडती घेतली. तेव्हा रितेश आणि राहुल याच्या झडतीत एक-एक गावठी पिस्तूल मिळाले. तसेच, ४ काडतूसे मिळाली. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघेही पिस्तूल हे दहशत बसविण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रितेश कसबे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती काळेपडळ पोलिसांनी दिली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page